लंडन उच्च न्यायालयानं व विजय मल्ल्या याचा भत्ता वाढवून देण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे मल्ल्याला आता आठवड्याला सुमारे १६.२८ लाख रुपयांचा भत्ता मिळणार आहे. मल्ल्याची सर्व मालमत्तेवर जप्ती आलेली असल्यामुळे त्याला हा भत्ता मिळतोय. मल्ल्या याचा न्यायालयीन खर्च मोठा आहे. तसंच त्याच्या जीवन शैलीचा विचार करता न्यायालयानं त्याचा भत्ता १३ हजार ३२५ पाऊंड केलाय. लंडनच्या वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात मल्ल्याविरोधात प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews